(रुपेश गोडीवले/विनायक पाटील)
पेण दि. ९|- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट खासदार निलेश लंके यांनी पेण तालुक्यातील उद्योजक व गारगुंडी गावचे सुपुत्र प्रकाश झावरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा, उद्योजक व समाजसेवक राजूशेठ पिचिका यांनी खासदार निलेश लंके यांचा सत्कार व पाहुणचार केला. यावेळी चर्चा करताना प्रकाश झावरे यांचे सुपुत्र पियूष हे सध्या अमेरिकेतील शिकागो येथे नोबेल विजेत्या अर्थतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करीत आहेत. त्यांचाही उल्लेख याप्रसंगी करण्यात आला.
आपल्या मातीतील माणूस संघर्ष कष्ट जिद्दीच्या जीवावर पेण, रायगड येथे जाऊन उद्योग क्षेत्रात बांधकाम क्षेत्रात मोठे नाव कमावले अशा उद्योजक व गारगुंडी गावचे सुपुत्र प्रकाश झावरे यांच्या घरी सदिच्छा भेट देण्याचा आज योग आला असे उद्गार खासदार निलेश लंके यांनी यावेळी बोलताना काढले. या सदिच्छा भेटीप्रसंगी किहिम गावचे सरपंच पिंट्या शेठ गायकवाड,मनोज मोरे, संदेश शृंगारे, केतन भोईर, अंकित मोरे, दर्शन झेमसे, प्रथमेश ढेणे व इतर मित्रपरिवार उपस्थित होते.