(रुपेश गोडीवले/विनायक पाटील)
पेण दि.३०:- पेण नगरपरिषद प्रशासनात ३३ वर्षाची प्रदीर्घ सेवा बजावून दिलीप दत्तात्रेय बांधणकर ३१ऑगष्ट २०२५ रोजी निवृत्त होत आहेत.आज नगरपरिषद अधिकारी कर्मचारी वर्गाने त्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा मुख्याधिकारी जीवन पाटील यांचे अध्यक्षतेखाली सभागृहात उत्साहात संपन्न झाला. यावेळी १९९२ ते २००५ बॅच मधील बांधणार यांचे सहकारी व अधिकारी वर्गाने बांधणकर यांच्या प्रशासनातील उत्तम सेवेचा आणि शांत संयमी स्वाभाचे अनेक पैलू उलगडत त्यांचा गौरव केला.
या सेवापूर्ती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक लेखापाल किरण शहा यांनी व्यक्त करताना नगरपरिषद सेवेत कर्मचारी म्हणून रूजू झाल्यानंतर सर्वात जास्त काम वसूली विभागात केले, पाणीपुरवठा विभाग आणि आता आस्थापना विभागात शांत स्वभाव आणि चोख काम करण्याची वृत्ती त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली याच कौतुक करावेसे वाटते अशा शब्दांत गौरविण्यात आले.
पाणी पुरवठा विभागाचे रमेश देशमुख म्हणाले जॅकवेल काम असो वा लाईनचे कुठेच कमतरता भासू न देणारा सहकारी होता तर सामान्य प्रशासन विभागाचे विश्वनाथ गायकवाड यांनी आठवणी सांगताना आम्ही सेवेत सोबत लागलेले १८सहकारी भारत दर्शनासाठी चार ही दिशांना फिरलो त्या प्रवास खर्चाचा खडानखडा हिशोब न चुकता देणारा तसेच नेहमी शांत डोक्याने काम करण्याची वृत्ती असलेला माझा सहकारी होता आणि नेहमीच राहील. याशिवाय मुख्याधिकारी जीवन पाटील, बांधकाम अभियंता सुहास कांबळे, शेखर अभंग यांनी मनोगत व्यक्त करुन दिलीप बांधणकर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगर परिषद कर्मचारी संघटना, आस्थापना विभाग व इतर विभागातील सहकारी मित्रांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन दिलीप बांधणकर यांचा सपत्नीक सत्कार करुन शासकीय सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. सेवापूर्ती समारंभ याप्रसंगी मुख्याधिकारी जीवन पाटील लेखाधिकारी किरण शहा बांधकाम विभाग अभियंता सुहास कांबळे, आस्थापनाचे उमंग कदम, आरोग्य विभागाचे दयानंद गावंड, सामान्य प्रशासन विश्वनाथ गायकवाड कर निरीक्षक अमोल नप्ते, गोविंद भिसे, वसुली, पाणी पुरवठा विभाग प्रमुख रमेश देशमुख, यांच्यासह इतर सर्व कर्मचारी महिला कर्मचारी दिलीप बांधणकर यांचे कुटुंबीयआई इंदू बांधनकर पत्नी सौ.साधना बांधणकर दोन मुलं दोन भाऊ बहीण असे या सोहळ्याला उपस्थित होते.