(विनायक पाटील/रुपेश गोडीवले)
पेण दि. ८:- पेणच्या इतिहासात प्रथमच पेण बॅडमिंटन क्लब आणि वॉरियर्स ॲकॅडमीचे कोच कामेश कदम याच्या संयोजनाने दि.५-६/१०/२०२४ रोजी पेण क्रिडा संकुलात पेण बॅडमिंटन प्रीमियर लीग (PBL 2024) ही स्पर्धा भरविण्यात आली होती. यामध्ये AG बॅडमिंटन वॉरियर्स एंड डेव्हलपर्स, स्मॅश अँड डॅश, नेट निंजास, कोर्ट कमांडर्स या चार संघांनी सहभाग घेऊन आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले.
दोन दिवसाच्या थरारक सामान्यानंतर स्मैश एंड डैश (संघमालक- कामेश कदम) हा संघ विजयी झाला आणि दुसऱ्या क्रमांकचा मानकरी ठरला कोर्ट कमांडर हा संघ. तसेच तिसऱ्या क्रमांकावर AG बॅडमिंटन वॉरियर्स एंड डेव्हलपर्स (संघमालक-अर्चित गाडगीळ) आणि चौथ्या क्रमांकावर नेट निंजा (संघमालक- मिलिंद पाटील) ह्यांनी पटकविला. तसेच लहान मुलांमध्ये झालेल्या स्पर्धेत कु. लाभ कोठेकर हा विजेता व अर्श ठाकुर हा उपविजेता ठरला. तर स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडूचा किताब क्षितिज कश्यपने मिळवला.
या स्पर्धेमध्ये कु. मनाली समेळ व कु. मृण्मयी ठाकूर ह्या दोन कर्ण बधिर मुलींनी सुद्दधा भाग घेतला होता. यावेळी विजेत्या सर्व स्पर्धकांना मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेला युवानेते वैकुंठ पाटील यांनी हजेरी लाऊन खेळाडुंना मोलाचे मार्गदर्शन केले.
या पेण बॅडमिंटन प्रीमियर लीग (PBL 2024) स्पर्धेचे आयोजन पेण बॅडमिंटन क्लबचे राजेश कोठेकर, आषय ठाकुर, सौरभ भोईर, अक्षय पाटील, सर्वेश वाडकर, ओमकार लवाटे, अर्चित गाडगीळ, उत्तम गावंड, अनिरुद्दध भावे, देवांश ओक आणि वॉरियर्स ॲकॅडमीचे कोच कामेश कदम यांनी केले होते. आयोजकांच्या मते, ही स्पर्धा नवीन खेळाडूंना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतून उत्तम खेळाडू घडावेत आणि पेण नगरीचे नाव उंचावले जावे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.