(रुपेश गोडीवले/विनायक पाटील)
पेण दि. 7:- शनिवार दि. 05 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास आसीफ अखील अखवारे (वय 25 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, ता. पेण, जि. रायगड) हा घराबाहेर जातो असे सांगून निघून गेला व अद्यापपर्यंत घरी परत आलेला नाही. त्याचा वर्णन – रंग गोरा, केस काळे, उंची 5 फूट 3 इंच, अंगावर काळ्या रंगाचा शर्ट, नेसूस जीन्स पँट व पायात चप्पल होती.
फिर्यादी अखील युनीसमियाँ अखवारे (वय 55 वर्षे, व्यवसाय – चालक) यांनी आपल्या मुलाच्या हरवल्याबाबत दि. 05 एप्रिल रोजी रात्री 11.11 वाजता पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी मुलाचा नातेवाईकांकडे व परिसरात शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार झावरे (मो. 8976685123) करत आहेत. प्रभारी अधिकारी मा. पोनि. बागुल (मो. 8692999100) यांनी मार्गदर्शन केले आहे. कोणी व्यक्ती आसीफ अखवारे याच्याबद्दल काही माहिती जाणत असल्यास त्यांनी त्वरित पेण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.