(विनायक पाटील/रुपेश गोडीवले)
पेण दि. ८|- पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलचे आय सी यू इन्चार्ज डॉ.विवेक सिंग यांचा ४८ वा वाढदिवस हॉस्पिटलच्या हॉल मध्ये केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी युवानेते तथा भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील आणि डॉ.शैलेंद्र म्हात्रे यांच्या सह मान्यवर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत राहून डॉ.विवेक सिंग यांना वाढदिवसानिमित शुभेच्छा दिल्या.
८ वर्षापासून डॉ.विवेक सिंग हे म्हात्रे हॉस्पिटल मध्ये आय सी यू इंचार्ज म्हणून चांगली सेवा रुग्णांना देत आहेत ते एमबीबीएस असून चेस्ट फिजिशियन व पल्मोनोलॉजिस्ट तज्ञ असल्याने म्हात्रे हॉस्पिटलच्या माध्यमातून असेच चांगले काम पुढे ही त्यांच्याकडून करण्यात यावे असे गौरोद्गार यावेळी युवा नेते वैकुंठ पाटील यांनी शुभेच्छा देताना काढले.
यावेळी त्यांच्या समवेत उद्योजक प्रकाश झावरे, म्हात्रे हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेंद्र म्हात्रे, अजय क्षीरसागर, डॅनियल पटेल, राकेश पाटील, हॉस्पिटल स्टाफ, हितचिंतक तसेच पत्रकार विनायक पाटील, किरण बांधणकर, प्रशांत पोतदार यांनी डॉ.विवेक सिंग यांना वाढदिवसा निमित्त भेटून शुभेच्छा दिल्या.